पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिचा जीवनगौरव पुरस्कार बार्शी येथील डॉ. बी. वाय. यादव यांना जाहीर झाल्याची माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
डॉ. यादव यांनी शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. जीवनगौरव पुरस्कार बार्शीचे डॉ. यादव यांना जाहीर झाला आहे. रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सोमवार, दि. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी विद्यापीठाचा १६ वा दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. याचे औचित्य साधून विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्र. कुलसचिव प्रा. डॉ. विकास घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, कनि लिपिक मल्लकार्जून मुडगी यांनी कामकाज पूर्ण केले.
यांनाही जाहीर झाले पुरस्कार १) उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार : शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज २) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: के. एन. भिसे, आर्टस, कॉमर्स, विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, कुर्डूवाडी ३) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार : प्राचार्य, डॉ. बब्रुवाहन पांडूरंग रोंगे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर ४) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार: डॉ. विष्णू पांडूरंग शिखरे, कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी ५) उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार: कैलास वसंतराव देशमुख, प्रबंधक, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा |