प्रतिनिधी / बेळगाव
भारतातील आयएमए या नामांकित वैद्यकीय संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवि वानखेडकर यांची जागतिक वैद्यकीय संघटनेच्या कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे. भारताला दुसऱयांदा प्रतिनिधित्व आणि बहुमान मिळाला आहे. डॉ. वानखेडकर 2023 पर्यंत कोषाध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत.
सेऊल (साऊथ कोरिया) येथे झालेल्या 2017 व्या परिषदेत जागतिक वैद्यकीय संघटनेने डॉ. वानखेडकर यांची कोषाध्यक्षपदी फेरनिवड केली. आपल्या कारकिर्दीत ते जगातील तसेच देशातील आरोग्य सेवेतील विषमता यावर भर देणार आहेत. सर्वांना समान वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.
कोरोनाकाळात त्यांनी अव्याहतपणे आपले कार्य सुरू ठेवले आहे. डॉ. वानखेडकर 2018 मध्ये आयएमएच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांची यशस्वी कारकीर्द पाहून गतवषी त्यांची सार्क वैद्यकीय संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी जागतिक वैद्यकीय संघटनेपर्यंत मजल मारली. या संघटनेची स्थापना 1947 मध्ये झाली. यामध्ये 113 देशांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य समस्यांवर ही संघटना काम करते.