ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना सद्यस्थिती आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आज काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीला गोवा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि पुदुचेरी येथील आरोग्य मंत्री तसेच अंदमान आणि निकोबार बेटांचे राज्यपाल, चंदीगड, दादरा नगर हवेली, दीव आणि दमन, जम्मू-काश्मीर, लडाख आणि लक्षद्वीपचे राज्यपाल उपस्थित राहतील.