प्रतिनिधी /तिसवाडी
डोंगरी येथील प्रसिद्ध इंत्रुजोत्सवात श्री जगदंबा शष्ठी शांतादुर्गा नाटय़ मंडळाने सादर केलेला ‘मोगाचे पिशे’ या नाटकाच प्रथम प्रयोग रंगतदार झाला. प्रेमाला वयाचे बंधन नाही, सर्वांनी एकमेकांवर प्रेम करुन आपले जीवन सुखी बनवण्याचा प्रयत्न करावा, असा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे.
डोंगरी येथील प्रसिद्ध साहित्यिक तुळशीदास काणकोणकर यांनी हे नाटक लिहिले आहे. यापुर्वी त्यांनी अनेक नाटके, कविता, कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या साहित्याला पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. या नाटय़प्रयोगाचे दिग्दर्शन युवा नाटय़ दिग्दर्शक शेखर उजगावकर यांनी केले. प्रवीण कुर्तीकर, वैष्णवी झो, सोनाली च्यारी, वैभव काणकोणकर, रूपेश शिरोडकर, राजेश भोमकर, मनोज भोमकर, संदीप नाईक यांनी आपल्या भूमिका रंगतदारपणे वठवल्या.