दिल्लीचा करण जगातील पहिला फुल मॉडिफाइड बॉडीबिल्डर
पूर्ण शरीर टॅटूने आच्छादलेले गेलेल्या दिल्लीतील करणची छायाचित्रे सध्या व्हायरल होत आहेत. टॅटू काढून घेण्यास किती वेदना सहन कराव्या लागतात हे त्या व्यक्तीलाच माहिती असते. पण दिल्लीतील करण हा जगातील पहिला फुल मॉडिफाइड बॉडीबिल्डर असून त्याने अनेक विक्रम स्वतःच्या नावावर केलेले असल्याने गिनिज बुकमध्ये त्याचे नाव नोंद झाले आहे.
टॅटूग्राफर करणच्या शरीराच्या प्रत्येक हिस्स्यावर टॅटू आहे. डोळय़ातील पांढरा हिस्सा असो किंवा डोकं, पार असो एवढेच नाही तर त्याने स्वतःच्या जीभेला मॉडीफाय केले आहे. यामुळे त्याची जीभ सापासारखी झाली आहे. कानांनाही त्याने वेगळा आकार दिला आहे. तर लोखंडी दात बसवून घेतले आहेत.
दिल्लीच्या पंजाबी बागमध्ये राहणार करण सिद्धू सध्या 32 वर्षांचा आहे. त्याचा स्वतःचा टॅटू पार्लर आहे. वयाच्या 16 व्या वर्षापासून सिद्धूने टॅटू काढून घेण्यास सुरुवात केली होती. हळूहळू टॅटूचे वेड वाढत गेल्याने सिद्धू आता टॅटूग्राफर करण ठरला आहे. स्वतःच्या आधारकार्डमध्येही त्याने स्वतःचे नाव ‘टॅटूग्राफर करन’ करण’ करवून घेतले आहे.
टॅटूग्राफर करणने स्वतःचा आयबॉल्स (डोळय़ांमध्ये) टॅटू करवून घेतला ओ. भारतात असे करणारा पहिलाच व्यक्तीच असल्याचा त्याचा दावा आहे. त्याने न्यूयॉर्कमध्ये डोळय़ांमध्ये टॅटू करवून घेतला होता. यात अंधत्व येण्याचा धोका होता. डोळय़ांबरोबरच त्याचे पूर्ण शरीर टॅटूंनी झाकले गेले आहे. भारतात फुलबॉडी सूट टॅटू करविणारा पहिला व्यक्ती असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
बॉडी मॉडिफेशनच्या पुढील पातळीत त्याने स्वतःचे खरे दात हटवून त्यांच्या जागी मेटलचे (क्रोम) दात बसवून घेतले आहेत. करणने स्वतःची जीभ कापून ती सापासारखी केली आहे. यात जीभेला तीनवेळा मॉडिफाय करण्यात आल्याने ती दोन हिस्स्यांमध्ये विभागली गेली आहे.
स्वतःचे पॅशन, स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवन धोक्यात टाकल्याचे तो सांगतो. टॅटू काढून घेणे सोपे नसते, यात खूप रक्त वाहिले असून अनेकदा बेशुद्धही झाल्याचे तो म्हणाला. पण त्याच्या कुटुंबाने त्याला याप्रकरणी साथ दिली. करणचे वडिल प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत. माझ्या आयुष्यावर लवकरच एक माहितीपट येणार असल्याचे त्याने म्हटले आहे. टॅटूग्राफर करणच्या नावावर एक जागतिक विक्रम देखील आहे.