मुंबई
तत्वचिंतन फार्माचा भारतीय भांडवली बाजारात आयपीओ दाखल होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. कारण बाजारातील नियामक सेबीने आयपीओला मंजुरी दिली आहे. 16 जुलैला बाजारात कंपनीचा आयपीओ सादर होणार आहे. तत्वचिंतन फार्मा सदरच्या आयपीओ सादरीकरणातून 450 कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याअंतर्गत 225 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर केले जाणार आहेत. कंपनी आपली उत्पादने 25 हून अधिक देशांना निर्यात करते. कंपनीला विविध देशांमधून 75 टक्के इतका महसूल प्राप्त होत असतो.