प्रतिनिधी /तिसवाडी
तपोभूमी कुंडई येथे लेखक राजू भिकारो नाईक यांच्या लेखणीतून साकार झालेले व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर लेखन करणारे राजू भिकारो नाईक यांनी लिहिलेल्या योध्दा संन्यासी विवेकानंद या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरूवार दि. 24 रोजी रात्रौ 8.15 वा. प. पु. ब्रम्हेशानंद स्वामी, अनिल सामंत व लेखक राजू भिकारो नाईक उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प. पु. पदमनाभ शिष्य संप्रदाय तपोभूमी पिठाधिश्वर तथा पद्श्री ब्रम्हेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या हस्ते योध्दा संन्यासी विवेकानंद यांच्या पुस्तक प्रकाशन होणार आहे. पुस्तकावर भाष्य अध्यक्ष, गोवा मराठी अकादमी अनिल सामंत यांचे पुस्तकावर भाष्य होणार आहे. तरी लेखक राजू भिकारो नाईक यांच्या प्रेमापोठी व असंख्य मराठी प्रेमीनी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.