प्रतिनिधी /मडगाव
वास्को न्यायालयाने परप्रांतातील संशयित आरोपी कोंतीकल्ला बाबू याला त्याच्यावरील आरोपातून बुधवारी निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला. जुगार प्रतिबंधक कायद्याखाली त्याच्याविरुद्ध खटला चालू होता.
वास्को पोलिसांनी या संशयिताला जुगार प्रतिबंधक कायद्याच्या 11(2) (अ) कलमाखाली अटक केली होती आणि नंतर जामिनावर सोडून दिले होते.
कालांतराने न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. वास्कोच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली लोटलीकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा वास्को पोलीस हा खटला न्यायालयात सिद्ध करु शकला नाही. परिणामी न्यायालयाने संशयित आरोपीला निर्दोष मुक्त करण्याचा बुधवारी आदेश दिला.