क्रीडा प्रतिनिधी/ फोंडा
गोवा क्रिकेट संघटनेने सांगे मैदानावर आयोजित केलेल्या ब विभागीय क्रिकेट स्पर्धेत तरवळे संघाने मदनंत क्रिकेट क्लबवर 8 गडी राखून विजय मिळविला. तरवळेच्या प्रज्वल घोडकेने तडाखेबाज नाबाद 95 धावा फटकावल्या तर कौशिक चिखलेकरने 5 गडी बाद केले.
विजयासाठी आवश्यक असलेल्या 160 धावा तरवळे संघाने 19.5 षटकात 2 गडय़ांच्या मोबदल्यात पार केल्या. प्रज्वल घोडकेने नाबाद 95, सुरज तारी 36 व रघुवीर लोटलीकरने 18 धावा केल्या. मदनंततर्फे पूर्णिदास पालकर व प्रणय तारीने प्रत्येकी 1 बळी घेतला. तत्पूर्वी मदनंत संघाने नाणेफेक जिंकून प्रथम खेळताना 38 षटकात सर्वबाद 159 धावा काढल्या. तनीश खेडेकरने 30 तर अंबर नाईक व ऋषीकेश नाईकने प्रत्येकी 20 धावा जमविल्या. कौशिक चिखलेकरने 5, अमोघ प्रभुदेसाई 2 व सिद्धेश वेरेकरने 1 गडी बाद केला.