ऑनलाईन टीम / अमृतसर
गेले काही दिवस पंजाब काँग्रेसमध्ये धुसफुस सुरु असून पंजाबचे नेतृत्वावरुन सुरु झालेला हा अंतर्गत कलह अद्याप थांबलेला नाही. कारण पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदावरुन राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधील राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत जात आहेत. यात आता अमरिंदर यांची पत्नी आणि काँग्रेसच्या खासदार परनीत कौरसुद्धा काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याची एका वृत्तपत्राशी बोलाताना स्पष्ट केले आहे. आपली नाराजी व्यक्त करताना राष्ट्रीय काँग्रेसची स्थिती जैथे राहील्यास काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये ११७ पैकी १५ जागाही पक्षाला जिंकता येणार नाहीत असा टोला परनीत यांनी लगावला आहे.
पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. यामुळे पंजाबमध्ये आता पासुनच राजकिय पक्षांनी आपली ताकद आजमावत असुन. पुढील राजकिय चाली खेळण्यासाठी ही चाचपणीच सुरु आहे. असे असले तरी काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला अद्याप पुर्ण विराम मिळाला नसल्याने काँग्रेस खासदार परनीत कौर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी बोलताना अमरिंदर सिंग हे एक सैनिक आहेत. त्यामुळे या युद्धामध्येही ते नक्कीच विजयी होतील असा विश्वास परनीत यांनी व्यक्त केला आहे.