तक्रारी करूनही महापालिका आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील डेनेज वाहिन्या तुंबण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून समस्येचे निवारण करण्यास महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे. तानाजी गल्ली तसेच शहरातील विविध परिसरात डेनेज वाहिन्या तुंबण्याची समस्या नागरिकांची डोकेदुखी बनली आहे. याकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी साफ दुर्लक्ष केले असल्याने डेनेज चेंबर ओव्हरफ्लो होवून वाहत आहेत.
डेनेज वाहिन्या तुंबण्याच्या समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. याला सर्वश्री महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. शहरातील डेनेज वाहिन्या घालून तीस वर्षांहून अधिक वर्षे झाली. तसेच लोकसंख्येमध्येदेखील वाढ झाली आहे. लोकसंख्येनुसार येथील डेनेज वाहिन्या बदलण्याची गरज आहे. मात्र याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी डेनेज वाहिनीमधून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. यामुळे ठिकठिकाणी ड्रेनेज चेंबरमधून सांडपाणी वाहत आहे. शहरात ही समस्या मोठय़ाप्रमाणात भेडसावत असल्याने अमृत योजनेंतर्गत डेनेज वाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र त्यापाठोपाठ शहरातील ड्रेनेच वाहिन्यांबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. शहरातील गटारीचे सांडपाणी ड्रेनेज वाहिन्यामध्ये सोडण्यात आले असल्याने गटारीमध्ये टाकण्यात येणारा कचरा, प्लास्टिक पिशव्या आदी ड्रेनेज वाहिन्यामध्ये अडकून रहात आहेत. अशातच ड्रेनेज वाहिन्या लहान आकाराच्या असल्याने सांडपाण्याचा निचरा होणे मुश्कील बनले आहे. यामुळे तानाजी गल्लीत रेल्वे ट्रकजवळ डेनेज चेंबरमधून सांडपाणी ओव्हरफ्लो होत आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही याची दखल घेतली जात नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. डेनेज चेंबरमधील सांडपाणी उघडय़ावर वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.