दुर्गामाता दौडची अमाप उत्साहात सांगता
वार्ताहर/ किणये
तालुक्मयात शुक्रवारी दसरोत्सव मोठय़ा उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सकाळपासूनच भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी दिसून आली. दसऱयानिमित्त विविध मंदिरांमध्ये विशेष पूजा करण्यात आली. दुपारनंतर गावागावांमध्ये टाळ-मृदंगाचा गजर व पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणुका काढण्यात आल्या. सायंकाळी गावांच्या सीमेवर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम झाला.
गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या दुर्गामाता दौडची शुक्रवारी सकाळी भगवेमय वातावरणात व तरुण-तरुणींच्या अमाप उत्साहात सांगता झाली. नवव्या व शेवटच्या दिवसानिमित्त दुर्गामाता दौड ग्रामीण भागात विलोभनीय अशीच ठरली. गावागावांमधील प्रत्येक गल्ल्यांमध्ये भगव्या पताका बांधण्यात आल्या होत्या. आकर्षक रांगोळय़ा घालण्यात आल्या होत्या. पांढरे वस्त्र तरुणांनी परिधान केले होते. मराठमोळी संस्कृती जपणाऱया साडय़ा तरुणींनी परिधान केल्या होत्या. तरुण व तरुणींच्या डोक्मयावर भगवा फेटा यामुळे तालुक्मयात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.
तालुक्यातील विविध देवदेवतांच्या मंदिरांमध्ये घटस्थापनेच्या दिवशीपासून रोज काकड आरती, अभिषेक, पूजा, महाआरती, हरिपाठ, भजन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. नऊ दिवसांच्या कालावधीत पोवाडय़ांचे कार्यक्रम तसेच विविध स्पर्धा व मनोरंजनाचे कार्यक्रमही झाले. कोरोनाचे संकट कायम असल्याने नवरात्रोत्सव व दुर्गामाता दौड कोरोना नियमावलीप्रमाणेच झाली.
दसरोत्सवानिमित्त शुक्रवारी सीमोल्लंघन, आपटय़ाची पाने वाटून ‘सोनं घ्या, सोन्यासारखं रहा…’ म्हणून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. बळिराजाने शिवारात लागणाऱया औजारांची पूजा केली. झेंडूची फुले वाहून, ऊस पूजेला ठेवून खंडीची पूजा शेतकऱयांनी मनोभावे केली.
नवरात्रोत्सवात देवीच्या पूजनाला अधिक महत्त्व आहे. काही गावांमध्ये दुर्गामाता मूर्ती आणून घटस्थापनेच्या दिवशी विधिवत पूजा-अर्चा करून प्राणप्रति÷ा करण्यात आली होती. बेळगुंदी, सोनोली, बिजगर्णी या गावांसह अन्य काही गावांमध्ये दुर्गामाता मूर्तीची प्रति÷ापना करण्यात आली होती. या ठिकाणी रोज पूजा, आरती, तसेच दांडिया व विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम झाले.
तालुक्मयात बहुतांशी गावांमध्ये कल्मेश्वर, सिद्धेश्वर व महादेवाची पिंडी असणाऱया मंदिरांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी रोज वेगवेगळय़ा रूपात पूजा बांधण्यात येत होती. सर्व मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे सर्वत्र झगमगाट दिसून येत होता.
ग्रामीण भागात नवरात्रोत्सव वेगवेगळय़ा पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार काही गावातील मंदिरांमध्ये गावातील भक्तमंडळी नऊ दिवस मंदिरांमध्ये बसून होते. रोज उपवास करणे, भगवंताचे नामस्मरण करणे असा त्यांचा नित्यक्रम होता. दसरोत्सवाच्या दिवशी त्यांच्या या व्रताचीही सांगता झाली.
शिवप्रति÷ान हिंदुस्थान शाखा सावगाव यांच्यावतीने काढण्यात आलेल्या दुर्गामाता दौडला पंचक्रोशीतील शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नऊ दिवस जल्लोषात ही दौड झाली. शुक्रवारी पहाटे हनुमाननगर पहिला स्टॉप येथून गावातील नागरिक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रेरणामंत्र म्हणून ध्वज चढविण्यात आला. त्यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देऊन दौडला सुरुवात करण्यात आली.
रामदेव गल्ली, शिवाजी गल्ली, लक्ष्मी चौक, विठ्ठल गल्ली, पाटील गल्ली, कलमेश्वर गल्ली, तानाजी गल्ली, मरगाई गल्ली, संभाजी गल्ली, मारुती गल्ली, विठ्ठल मंदिरमार्गे दौड शिवस्मारक येथे आली. गल्लोगल्ली भगवे ध्वज, पताका लावण्यात आल्या होत्या. आकर्षक रांगोळय़ा काढण्यात आल्या होत्या. महिला आरती ओवाळून दौडचे स्वागत करीत होत्या.
ध्येयमंत्र म्हणून ध्वज उतरवून सांगता करण्यात आली. यावेळी किशोरराव सुतार यांनी आपल्या प्रखर वाणीतून दौडीला उपस्थित धारकऱयांना मार्गदर्शन केले.
पिरनवाडी गावात जल्लोषात दुर्गामाता दौडची सांगता झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. शुक्रवारी शेवटच्या दौडमध्ये महिला, तरुणी, आबालवृद्धांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दौडची सांगता झाली.
बेळगुंदी येथील पुजाऱयांनी डोक्यावर पेटता दिवा ठेवून गावातील सर्व देवदेवतांची पूज-अर्चा केली. सीमेवर पालखी नेऊन सीमोल्लंघन करण्यात आले. बहाद्दरवाडी गावात ब्रह्मलिंग मंदिरात रोज पहाटे काकड आरती, सायंकाळी हरिपाठ व रात्री जागर भजनाचा कार्यक्रम झाला. धामणे येथे भैरू बाळेकुंद्री महाराज यांचे कालाकीर्तन झाले. गावात दिंडी प्रदक्षिणा झाली. दसरोत्सवानिमित्त विठ्ठलाई मंदिर येथून आपटय़ाची पाने वाटण्यात आली.
बाळगमट्टी येथील ब्रम्हलिंग मंदिर परिसरात मच्छे व बाळगमट्टी देवस्थानची पालखी मिरवणूक झाली. त्यानंतर सीमोल्लंघन झाले. बस्तवाड (हा.) गावात नऊ दिवस मोठय़ा उत्साहात दुर्गामाता दौड झाली. शुक्रवारी प्रत्येक गल्ल्यांमध्ये आकर्षक रांगोळी काढून, रांगोळय़ांमध्ये फुलेही ठेवण्यात आली होती. दौडचे स्वागत पुष्पवृष्टी करून करण्यात येत होते. किणये, बिजगर्णी, बेळवट्टी, मंडोळी, मच्छे, वाघवडे, संतिबस्तवाड, हंगरगे, नावगे आदी भागातील दौडची उत्साहात सांगता झाली.