प्रतिनिधी / तासगाव
तासगावातील माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील तालुक्यातील कवठेएकंद येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती जयवंत माळी तसेच सावर्डे येथील सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने यांनी शनिवारी भाजपाला रामराम करत मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाने तालुक्यात खळबळ उडाली असून तालुक्यात भाजपला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.