प्रतिनिधी / सांगली
सांगली महानगरपालिकेचे बदली कामगार, मानधनावरील कामगार, आणि रोजंदारीवरील कामगार यांच्या किमान वेतनावरील आधारित विशेष भत्ता संदर्भातील प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी सोडवला त्याबद्दल मनपा कामगार सभा सांगली यांनी सत्कार आयोजित केला.
यावेळी युवक अध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्याक अध्यक्ष आयुब बारगीर, सोबत युसूफ जमादार व सर्व कामगार उपस्थित होते.