प्रतिनिधी / तासगाव
तासगाव शहरासह तालुक्यात सलग दोन दिवसात एका ही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तालुक्यासाठी हे दिलासादायक आहे. तर तालुक्यात शनिवारी 39 रूग्ण सापडले आहेत.
तालुक्यात 145 दिवसात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 2327झाली आहे.
शनिवारचे रूग्ण असे—तासगाव-6, मणेराजुरी-2, बस्तवडे-2, तुरची-2, नरसेवाडी-2, सावळज-2, डोंगरसोनी-9, लिंब-8 तसेच वायफळे,दहिवडी, आळते, आयेथील प्रत्येकी एक असे एकूण 39 रूग्ण सापडले आहेत.
तासगाव तालुक्यात दि.2,व 3,ऑक्टोंबर या दोन दिवसात एका ही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. हे तालुक्यासाठी दिलासादायक आहे.