प्रतिनिधी / तासगाव
तासगाव तालुक्यात गुरुवारी 200 जणांची तपासणी होऊन ही दोन गावात दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तासगाव शहरात सलग सातव्या दिवशीही 0 रुग्ण असे चित्र पहावयास मिळाले आहे.
तालुक्यात आत्तापर्यंत 193 दिवसात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 3184 झाली आहे. तालुक्यात गुरूवारी अंजनी व मांजर्डे येथे प्रत्येकी एक असे दोन गावात दोन रुग्ण सापडले आहेत.तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रूग्ण संख्या कमी, मृत्यू चे प्रमाण कमी असे चित्र पाहवयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.