प्रतिनिधी / सातारा :
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांच्या सुचनेनुसार तालुका पोलिसांनी तासगाव येथे बेकायदेशीर सुरु असलेल्या दारु अड्डय़ावर छापा टाकून कारवाई केली. यामध्ये एकावर गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासगाव येथील लहु बाबूराव तारु (वय 55, रा. तासगाव) हा बेकायदेशीर दारु विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांना मिळाली होती. त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली. त्यामध्ये लहु तारु हा दारु विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 690 रुपयाच्या दारुच्या बाटल्या हस्तगत करुन त्यावर महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम 1949 चे कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा तालुका पोलीस याचा तपास करत आहेत.