सावंतवाडी / प्रतिनिधी:-
तिरोडा गावात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तिरोडा ग्रामपंचायत यांच्यावतीने तिरोडा खाशेवाडी दत्तमंदिर येथे ग्रामस्थांचे कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले. सहा जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली.त्यात चारजण पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले. तर ५४ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल मंगळवारी येणार आहे. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅ. आदीती ठाकुर, डाॅ. अंकिता पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर झाले.
सरपंच माधुरी पटेकर, माजी सरपंच विश्वनाथ आडारकर, पोलिस पाटील लवु रगजी, संदेश केरकर, विकी सावंत, संदेश सावंत, अभिषेक सावंत,हरी मयेकर, राजु गावकर यांनी शिबिराला सहकार्य केले. ताप,सदीॅ, खोकला आल्यानंतर ग्रामस्थात भितीचे वातावरण असते. कुणी पहील्या टप्प्यात तपासणी करण्यास पुढे येत नाही. ही भिती घालवुन खबरदारी कशी घ्यावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.