आगीमुळे वाहनाचे नुकसान
बेळगाव : तिसऱया रेल्वेगेटजवळ गुरुवारी रात्री एका धावत्या वाहनाला आग लागली. या घटनेने परिसरात एकच धावपळ उडाली. मालवाहू बोलेरोने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालक वाहनातून खाली उतरला. या मार्गावरुन ये-जा करणाऱया नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचे फवारे मारुन त्यांनी आग विझविली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.