चाहत्याकडून कौतुकानंतर जान्हवीची प्रतिक्रिया
जान्हवी कपूरचा चित्रपट ‘रुही’ अलिकडेच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच जान्हवीच्या अभिनयाचे मोठे कौतुक होत आहे. एका मुलाखतीत जान्हवीची तुलना आलिया भट्टशी करण्यात आली असता ती अत्यंत आनंदी झाली. एका चाहत्याने जान्हवीला ती आगामी काळात आलिया भट्टसारखी अभिनेत्री होऊ शकते सांगितले. यावर जान्हवीनेही अत्यंत मजेशीर प्रतिसाद दिला आहे.
गुंजन सक्सेनानंतर जान्हवी एका वेगळय़ा पातळीवर पोहोचली आहे. आगामी कारकीर्दीत दुसरी आलिया भट्ट होण्याचे सर्व गुण तिच्यात आहेत असे चाहत्याने म्हटले होते. याच्या उत्तरादाखल बोलताना जान्हवीने हे ऐकून मोठा आनंद झाला, तुमच्या तोंडात तूप साखर, लाडू, बिर्याणी, जे तुम्हाला हवे ते पडो असे म्हटले आहे. एखाद्या भुताटकी असलेल्या घरात अडकल्यास कुठल्या अभिनेत्रीसोबत राहणे आवडेल असा प्रश्न जान्हवीला विचारण्यात आला होता. यावर जान्हवीने आलियाचे नाव घेतले आहे.
जान्हवी सध्या ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. याचबरोबर करण जौहरची निर्मिती असलेल्या ‘दोस्ताना 2’ या चित्रपटातही ती दिसून येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि लक्ष्य लालवानी मुख्य भूमिकांमध्ये असणार आहेत.