मुंबई
ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱया प्रसिद्ध अदानी समुहातील अदानी ट्रान्समिशनने 1300 कोटी रुपयाचा प्रकल्प राबवण्याचे निश्चित केले आहे. मध्य प्रदेशामध्ये होणाऱया या प्रकल्पाकरिता लावलेली बोली अदानी ट्रान्समिशनने नुकतीच जिंकली आहे. सदरच्या प्रकल्पांतर्गत 19 नव्या सबस्टेशन्सची निर्मिती करून त्यायोगे वीज पुरवठा करण्याची योजना निश्चित केली आहे. सदरच्या प्रकल्पाकरिता स्टर्लाईट पॉवर, दिलीप बिल्डकॉन, पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि टोरेंट पॉवर यांनीही बोली लावली होती.