बीजिंग
युपेननंतर आता तैवानचा मुद्दा मोठय़ा प्रमाणात गाजताना दिसत आहे. तैवानच्या मुद्यावरून अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. चीनने यापूर्वी अलीकडेच दोन महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याचा परिणाम या दोन्ही देशांच्या संबंधांवर होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. चीनने अलीकडेच इराणमध्ये दुतावास कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली असून त्यादृष्टीने प्रयत्नांना दिशा दिली आहे. चीनचे विदेश मंत्री आफ्रिकेसंदर्भात रणनिती आखण्यासाठी आफ्रिका दौऱयावर जात असल्याची बाब समोर आली आहे. चीनचे विदेश मंत्री वेंग यी यांनी अमेरिकेला तैवानच्या बाबतीत लक्ष न घालण्याची उघडपणे धमकी दिली आहे. असेच चालू राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील असा सज्जड इशारा मंत्र्यांनी दिला असल्याचे सांगितले जाते. तैवान हा चीनचाच अविभाज्य भाग असल्यामुळे जगातील कोणतीही शक्ती तैवानला चीनपासून वेगळी करू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.