प्रतिनिधी/ सातारा
जलसंधारण विभागात कार्यरत असलेले लिपिक संजय कांबळे यांच्यावर पाणीपट्टी वसुली, पाणी परवाना यामध्ये अपहार केल्याचा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यांना निलंबित करण्यात आल्याचे मृदू व जलसंधारण उपयुक्त रवींद्र गोटे यांनी दि.23रोजी पत्र काढले आहे.
सातारा जिह्यातील अनेक शेतकयाचे पाणी परवान्यांच्या नावाखाली फसवणूक केली जात होती.त्या अनुषंगाने प्रहार संघटना, शिवसेना आणि इतर संघटनांनी या जलसंधारण विभागाचे वरिष्ठ लिपिक संजय कांबळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.गुरुवारी जलसंधारण विभागाचे आयुक्त यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईत म्हटले आहे की वरिष्ठ लिपिक संजय बापू कांबळे यांच्या विरोधात भा.द.वि. स.406, 463, 465, 471 नुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे ते दि.6जुलै ते 9 जुलै या दरम्यान पोलीस कोठडीत होते. ते दि.6पासून निलंबित राहतील.दरमहिन्याचा उपस्थिती अहवाल धुळे कार्यालयात द्यावा लागेल.कांबळे यांना खाजगी नोकरी, धंदा करता येणार नाही.ती केल्यास गैरवर्तन समजून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे त्या आदेशात म्हटले आहे.