ऑनलाईन टीम / मुंबई :
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी जे विरोध करत आहेत, सावरकरांना ठेवलेल्या सेल्यूलर तुरुंगातच पाठवा, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
केंद्र सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला तर त्या निर्णला विरोध करायला हवा, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
त्यातच आज एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, जे सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी विरोध करत आहेत. त्यांना सावरकरांना इंग्रजांनी ठेवलेल्या तुरुंगातच डांबायला हवे. तसे केल्याने विरोधकांना सावरकरांनी भोगलेल्या हालअपेष्टांची अनुभूती होईल.
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे शिवाजी महाराजांचे वारस असल्याचे पुरावे मागितल्यामुळे राऊत वादाच्या भोवऱयात अडकले आहेत. त्यातच त्यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत पुन्हा कटुता निर्माण होणार असल्याचे दिसते.