बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचा ‘तो’ व्हिडिओ काढून टाकण्याची सूचना
नवी दिल्ली/प्रतिनिधी
काही दिवसापूर्वी दिल्ली येथे एक नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली होती. भेटीनंतर राहुल गांधी यांनी फोटो ट्विट केल्यानंतर ट्वटिरने अकाऊंट बंद केले होते. यावेळी राहुल गांधी यांनी ट्विटरवर जोरदार टीका करताना देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याची टीका केली होती. त्यानंतर लगेचच ट्विटरकडून कारवाई मागे घेण्यात आली. आता नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) कडून समन्स मिळाल्यानंतर एका आठवड्यानंतर, फेसबुकने मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लिहिले की त्यांनी इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट डिलीटकरावी अशी विनंती केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओसंदर्भातील तक्रारीवर फेसबुकने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. या व्हिडिओमधून बलात्कार पीडित मुलीच्या पालकांची ओळख उघड झाल्याचे सांगण्यात आलं होते.
राहुल गांधींवर ट्विटरने कारवाई केल्यांनतर आठवडा भारत त्यांचे ट्विटर अकाउंट पुन्हा सुरु झाले. आता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) च्या १० ऑगस्ट २०२१ च्या नोटिसीनुसार, राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे अपलोड केलेली पोस्ट बेकायदेशीर असल्याचं म्हंटल आहे. त्यामुळे एनसीपीसीआरच्या सूचनेनुसार, ही पोस्ट त्वरित काढून टाकण्याची विनंती त्यांना केली आहे. यापूर्वी एनसीपीसीआरनेही राहुल गांधी यांच्यावर कारवाई करावी असे ट्विटरला पत्र लिहिले होते.
एनसीपीसीआरने फेसबुकला पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले होते. तीन दिवसांनंतर, १३ ऑगस्ट रोजी, त्यांनी फेसबुकला समन्स जारी केले. नोटीसला कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगितले. त्यानंतर कारवाई करत फेसबुकने राहुल गांधी यांना मेल केला आणि फोटो काढून टाकण्यास सांगितले. जेव्हा फेसबुकने राहुल गांधी यांना एनसीपीसीआरला मेलची प्रत पाठवली, तेव्हा बाल हक्क समितीने त्यांना समन्समधून सूट दिली.