सातारा जिल्हय़ात कोरोनाचा हाहाकार
मुक्त-बाधितांची पाठशिवणी
झाला टायफड उपचार कोरोनाचे
गोंधळले प्रशासन, गोंधळली जनता
प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात 800 च्या पटीत येणारी बाधितांची संख्या आणि 800 च्या पटीतच कोरोनामुक्त होणार्यांची संख्या असा पाठशिवणीचा खेळ सुरु आहे. एकीकडे रात्रभर कोसळणारा पाऊस अन् दिवसा पडणारे कडक ऊन. या वातावरणात व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, रुग्ण आला की त्याची पहिली कोरोना टेस्ट करण्यात येत असल्याने अनेकजण घरच्याघरीच उपचार करु लागलेत. कोरोना बरा होता, वेळेत उपचार घ्या असे प्रशासन सांगत असले तरी जिल्हय़ात भीतीदायक वातावरण आहे. यात जनताही गोंधळलेली अन् प्रशासनावर वाढलेल्या ताणामुळे ते देखील गोंधळलेले असा प्रकार सुरु आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयात एकाला टायफड असताना त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. यामध्ये जनता आता कोरोना, थांब रे आता, मृत्यूंजया थांबव रे खेळ तुझा, अशी भावना व्यक्त करु लागलीय.
दरम्यान, जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 800 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 17 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
बाधितांची वाढ थांबेना, मृत्यूचेही तसेच सुरु
जिल्हय़ात ऑगस्ट महिन्यापासून सुरु झालेली कोरोना बाधितांची वाढ सप्टेंबर महिन्यात आणखीनच वाढली. उच्चांकी आकडय़ामुळे लोकांना बातम्या वाचणे अन बघणेही बंद केले आहे. कोरोना बरा होतो असा धीर देत प्रशासनाने होम आयसोलेशन सुरु केले असले तरी कोरोना बाधित तसेच कोरोनासाठी काम करत असलेल्या आरोग्य कर्मचाऱयांना अस्पृश्यतेची वागणूक समाज देवू लागलाय. मृत्यूदर दररोज वाढताच आहे. यामध्ये ज्येष्ठांचे प्रमाण अधिक आहे. शेवटी अनेक ठिकाणी स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन करुन लोक संसर्ग साखळी तोडण्य़ाचा प्रयत्न करु लागले आहेत. मात्र संसर्ग थांबण्याचे नाव काढेना अन जनता पॅनिक झालीय याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
गुरुवारी रात्री अहवालात 800 बाधित
कराड तालुक्यात 87 बाधित
कराड 14, शनिवार पेठ 4, बुधवार पेठ 1, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, पाटण कॉलनी 1, रक्मिणी नगर 1, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, कोयना वसाहत 2, मलकापूर 4, आगाशिवनगर 1,अमरडे 1, कराड 5, कवठे 1, आटके 2, रेठरे 1, काले 3, साकुर्डी 1, पार्ले 1, विजयनगर 1, विद्यानगर 1, हजारमाची 2, वडगाव 1, सैदापूर 6, केसे 1, गोलेश्वर 3, इंदोली 1, बनवडी 2, वाखन 1, वाठार खुर्द 2, रेठरे बु 4, भोगाव 1, विंग 1, उंडाळे 1, ओंड 1, शेरे 1, वहागाव 1, कार्वे 2, शिरवडे 4, तांबवे 1, कोपर्डे हवेली 1, हेळगाव 1.
सातारा तालुका 212 बाधित
सातारा 38, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 4, गुरुवार पेठ 1, बुधवार पेठ 3, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, सदरबझार 7, करंजे 4, मल्हारपेठ 1, गोडोली 12, माची पेठ 1, केसरकर पेठ 1,मौती चौक सातारा 2 कोडोली 6, कर्मवीरनगर 1, शाहुपुरी 12, शाहुनगर 4, संभाजीनगर 3, संगमनगर 2, विकासनगर 1, स्वामी विवेकानंद नगर सातारा 1, मौती चौक 1, देगाव फाटा 1, पिरवाडी 1, राजापुरी 1, शिवथर 1, दरे खुर्द 1, आरफळ 1, वडुथ 1, पंताचा गोट सातारा 1, यादवगोपाळ पेठ 1, पाडळी 1, खेड 6, रामाचा गोट 1, विकासनगर 1, भवानी पेठ सातारा 1, दिव्यनगरी सातारा 1, वनवासवाडी 1, महागाव 1, क्षेत्र माहुली 2, चिंचणेर 1, जाधववाडी 2, देगाव 1, चिंचणी 1, आयटीआय रोड 2, गेंडामाळ सातारा 1, राधिका रोड 1, खिंडवाडी 1, प्राजक्ता कॉलनी 2, मल्हार पेठ सातारा 1, सोनगाव 2, मोळाचा ओढा सातारा 5, पिरवाडी 1, मेघामार्ट जवळ सातारा 1, शिवनगर एमआयडीसी सातारा 1, गडकर आळी सातारा 2, प्रतापगंज पेठ सातारा 2, विसावा नाका सातारा 2, प्रतापसिंहनगर सातारा 1, तारगाव 1, कोंडवे 5, अंबवडे 1, सिव्हील कॉलनी सातारा 1, शिवाजी हौसींग सोसायटी सातारा 1, लिंब 1, शेंद्रे 1, तामजाईनगर 3, अहिरेवाडी 2, वर्ये 7, राजापुरी 3, लवंघर 3, बोरगाव 1, म्हसवे रोड 3, रामनगर 1, किडगाव 10, कळंबे 1, कण्हेर 2, पानमळेवाडी 4.
कोरेगाव तालुका 81 बाधित
कोरेगाव 9, भक्तवडी 9, भोसे 1, बुरुड गल्ली कोरेगाव 1, चिमणगाव 1, जांब बु 2, चौधरवाडी 3, करंजखोप 10, रहिमतपूर 1, सोनके 4, राऊतवाडी 8, नायगाव 1, वाठार स्टेशन 4, सर्कलवाडी 6, पिंपोडे बु 2, भिवडी 3, सोळशी 1, वाठार 2, वाठार स्टेशन 3, पळशी 1, रहिमतपूर 2, कुमठे 1, गोडेसवाडी 1, कालकाई 1, खेड 1, कुमठे 1, शिरंबे 3.
वाई तालुका 78 बाधित
वाई 2, रविवार पेठ 4, पाचवड 1, बोपेगाव 3, गुरुबाजार वाई 1, गंगापुरी 3, सिद्धनाथवाडी 3, गणपती आळी 10, अभेपुरी 1, नव्याचीवाडी 3, पसरणी 2, लखननगर वाई 5, कवठे 1, धर्मपुरी 3, वेळे 1, दत्तनगर 6, सोनगिरवाडी 1, सह्याद्रीनगर 4, व्याजवाडी 5, दह्याट 1, चिखली 4, पांडेवाडी 3, मेणवली 3, बावधन 5, मधली आळी वाई 1, यशवंतनगर वाई 1, ओझर्डे 1.
जावली तालुका 42 बाधित
तालुक्यातील कुडाळ 7, पिंपळी 2, घोटेघर 5, सायगाव 6, करडोशी 1, उमरीवाडी 9, मेढा 7, केळघर 2, रांगणेघर 1, धोंडेवाडी 1, बामणोली 1.
माण तालुका 48 बाधित
गोंदवले 1, मलवडी 1, म्हसवड 23, शिंदी 2, वाले 1, स्वरुपखानवाडी 1, पळशी 2, सत्रेवाडी 1, गोंदवले बु 2, दहिवडी 8, भांडवली 5, पिंगळी बु 1.
पाटण तालुका 16 बाधित
पाटण 4, झेंड चौक पाटण 1, माजगाव 1.तळमावले 1, अंबळे 1, गावडेवाडी 4, अंबावळे 1, मल्हार पेठ 1, निसारे 2.
खंडाळा तालुका 20 बाधित
खंडाळा 1, लोणंद 7, शिरवळ 4, पळशी 2, पिसाळवाडी 1, पिंपरे 1, धनगरवाडी 1, अहिरे 1.
खटाव तालुका 20 बाधित
खटाव 1, पळसगाव 1, वडूज 3, चितळी 3, वाकेश्वर 1, तडवळे 1, अंबवडे 2, राजाचे कुर्ले 1, वारुड 1, हिंगने 1, वडुज 2, मायणी 2,गणेशवाडी 1.
महाबळेश्वर तालुका 15 बाधित
पाचगणी 5, चिखली 2, महाबळेश्वर 4, कोळेआळी 1, वेळापुर 3.
फलटण तालुका 63 बाधित
फलटण 14, रविवार पेठ 1, प्रिंप्रद 3, मिरेवाडी 4, लक्ष्मीनगर 2, पद्मावतीनगर 1, मलठण 3, विद्यानगर 1, गिरेवाडी 1, कोळकी 5, आसु 1, सस्तेवाडी 1, विद्यानगर फलटण 1, विडणी 6, साखरवाडी 1, माळेवाडी 1, कसबा पेठ सातारा 2, मलटण 1, भडकमकरनगर 1, बारोबा फलटण 1, शिवाजीनगर फलटण 1, कालढण 1, जिंती 1, बागेवाडी 3, खटकेवस्ती 6.
इतर 3 : बाहेरील जिल्ह्यातील मुंबई 2, पुणे 2, कोल्हापूर 5, ठाणे 1, सांगली 1, कुंडल जि. सांगली 1, गदरवाडी ता. बारामती 1, दुर्गळवाडी ता. तासगाव 1, येडेमच्छिंद्र जि. सांगली 1
जिल्हय़ात 17 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय सातारा येथे खोजेवाडी सातारा 65 वर्षीय पुरुष, माजगावकर माळ सातारा 65 वर्षीय महिला, खोडशी, ता. कराड 65 वर्षीय महिला, पानमळेवाडी 78 वर्षीय पुरुष, वाई 55 वर्षीय पुरुष, पंचशिलनगर ता. खंडाळा 50 वर्षीय पुरुष, मोरघर ता. जावली 65 वर्षीय पुरुष, सातारा 50 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा 60 वर्षीय पुरुष, तसेच विविध खासगी हॉस्पीटलमध्ये मध्य सायगाव ता. जावली 56 वर्षीय पुरुष, खेड माळवी सातारा 52 वर्षीय पुरुष, अंबवडे ता. खटाव 57 महिला, जाखणगाव ता. खटाव 69 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर फलटण 70 वर्षीय महिला, सावडे कराड 70 वर्षीय पुरुष, दौलत कॉलनी शनिवार पेठ कराड 56 वर्षीय महिला, ओंड 57 वर्षीय महिला असे एकूण 17 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
शुक्रवारपर्यंत जिल्हय़ात
घेतलेले एकूण नमुने 53,628
एकूण बाधित 22,147
बरे झालेले 13,082
एकूण मृत्यू 599
उपचारात 8,483