मुंबई : महिंद्रा आणि महिंद्राची नवीन लाँच झालेली ‘थार’ ही गाडी सध्या फॉर्मात दिसते आहे. कारणही नेमके तसेच आहे. या गाडीला बाजारात आल्यानंतर बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. या गाडीच्या लाँचनंतर पहिल्या चार दिवसात 9000 गाडय़ांचे बुकिंग कंपनीला प्राप्त झाले असल्याचे समजते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कंपनीकडून ही गाडी देशभरातील 18 शहरांमध्ये बुकिंगकरता उपलब्ध करण्यात आली आहे. या बुकिंग केंद्रांच्या ठिकाणी टेस्ट ड्रायव्हिंग आणि डेमो प्रदर्शनाची सोय करण्यात आली आहे. या 18 शहरांमध्ये ‘थार’ ही गाडी ग्राहकांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या वाहनाला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. गाडीची किंमत 9.8 ते 13.75 लाख रुपये इतकी आहे.
Previous Articleपिरामल फार्माने 20 टक्के हिस्सा विकला
Next Article सॅमसंगचे 10 लाख एलइडी टीव्ही विक्रीचे उद्दिष्ट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.