नवी दिल्ली
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांनी सप्टेंबर तिमाहीमध्ये व्हीएसटी इंडस्ट्रीजमधील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. सप्टेंबर 2021 तिमाही समाप्त झाल्यानंतर शेअरबाजाराला माहिती दिली असल्याचे सांगितले आहे. व्हिएसटी इंडस्ट्रीजकडून देण्यात आलेल्या माहितीमधून दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांनी जुलै ते सप्टेंबर तिमाहीत कंपनीमध्ये हिस्सेदारी खरेदी केली आहे. दमानी यांनी सिगारेट तयार करणारी आणि वितरण करणारी कंपनी व्हिएसटीमध्ये 1.63 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी केली आहे.