नवी दिल्ली : 15 ते 21 ऑक्टोबरच्या आठवडय़ामध्ये अनेक नवीन मोबाईल फोन्स किफायतशीर किमतीमध्ये लॉन्च करण्यात आल्याने ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्याचे दिसून आले आहे. रेडसीर या बेंगळूरमधील रिसर्च फर्मने यासंदर्भातला एक सर्वे केला असता पहिल्या आठवडय़ात विविध ई-कॉमर्स कंपन्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रत्येक मिनिटाला दीड कोटी रुपयांचे स्मार्टफोन्स विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्सवी काळामध्ये ग्राहकांनी दर्शवलेला प्रतिसाद उत्साहवर्धक ठरलेला आहे. यावरून स्मार्टफोनच्या विक्रीला येणाऱया काळातही प्रतिसाद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
Previous Articleमायक्रोमॅक्सचे ‘इन’ रेंज सिरीजचे स्मार्टफोन लवकरच
Next Article टाटा ग्रुप बिग बास्केटमध्ये घेणार वाटा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.