ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दहशतवाद्यांचा नदीमार्गे शस्त्र तस्करीचा डावभारतीय लष्कराने उधळून लावला आहे. दहशतवाद्यांकडून चार एके-47, 8 मॅगझिन्स आणि 240 एके रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
केरन सेक्टरमध्ये किशन गंगा नदी पात्रात दोन ते तीन दहशतवादी दोरीच्या सहाय्याने ट्यूबमधून काहीतरी नदीच्या पलीकडे नेत असल्याचे लष्कराच्या निदर्शनास आले. त्यानंतर लष्कराने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने संयुक्त मोहीम सुरु केली. या कारवाईत जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला.