वेंगुर्ला/ प्रतिनिधी-
वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय,वेतोरेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळेतून एप्रिल 2021 मध्ये इयत्ता 10 वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांस कै.दिनानाथ नाईक पारितोषिक दिले जाणार आहे.तरी एप्रिल 2021 मध्ये इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत साक्षांकित करून 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुख्याध्यापक श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे येथे आणून द्यावी किंवा मोबाईल नंबर7507577031 या व्हाट्सएप वर पाठवावी