गृहमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती : अंमली पदार्थ विरुद्धचा लढा सुरूच राहणार
प्रतिनिधी/ बेळगाव
अंमली पदार्थांविरुद्धचा लढा सुरूच आहे. गेल्या दहा वर्षांत जितके अंमली पदार्थ जप्त केले नाहीत तितके केवळ दहा महिन्यात जप्त करण्यात आले आहेत. तरुणाईला नशेच्या खाईत लोटणाऱया ड्रग माफिकांविरुद्ध लढा सुरूच राहणार आहे, असे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
महात्मा गांधी भवन येथे भाजप कार्यकारिणी बैठकीत भाग घेऊन पत्रकारांशी बोलताना गृहमंत्र्यांनी वरील माहिती दिली. संबंधितांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दहा महिन्यात पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
सध्या कॉलेज सुरू नाहीत. कॉलेज सुरू झाल्यानंतर अंमली पदार्थविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मराठा महामंडळाला विरोध करण्यासाठी कर्नाटक बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदमध्ये नागरिक सहभागी झाले नाहीत. बेंगळूरसह सर्व जिह्यात जनजीवन सुरळीत सुरू होते. पोलिसांनी अत्यंत व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रात्रीची संचारबंदी जारी करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, यासंबंधी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यंदा नववर्षाचे स्वागतही साध्या पद्धतीने करावे लागणार आहे, असे बसवराज बोम्मई यांनी सांगितले.