ऑनलाईन टीम / दादरा
देशभरातील 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील रिक्त असलेल्या विधानसभा, लोकसभेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. यातील दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच हाती आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी मोठी आघाडी घेत विजय मिळवला आहे.
महाराष्ट्राबाहेर कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरच्या पहिल्या खासदार आहे. दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर ही जागा रिक्त होती. ही जागा लढवत आपलं वर्चस्व कायम ठेवले आहे. दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर कलाबेन डेलकर यांनी उमेवारी मिळवत विजयासाठी आपली ताकद पणाला लावली होती. यावेळी त्यांनी १ लाख १६ हजार ८३४ मते घेत त्या विजयी ठरल्या आहेत. तर त्यांचे प्रतीस्पर्धी महेश गावित यांना ६६ हजार १५७ मते मिळाली आहेत.
कलाबेन डेलकर यांच आदित्य ठाकरेंनी केलं अभिनंदन
या निकालानंतर आदित्य ठाकरे यांनी श्रीमती कलाबेन डेलकर यांनी “दादरा नगर हवेलीत आज भगवा फडकवला. लोकसभा पोटनिवडणुकीत डेलकर यांचा विजय एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे. अन्याय आणि हुकूमशाही विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल असून आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील कलाबेन डेलकर यांचं अभिनंदन केलंय.