मौजेदापोली/ वार्ताहर
सध्या जिह्यात थंडीचा कडाका वाढत असून दापोलीचा पारा 8.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून नेंदवण्यात आले आहे. वाढलेल्या थंडीमुळे दापोलीकरांना हूडहूडी भरली असून नागरिक सायंकाळपासून शेकोटय़ा पेटवताना दिसून येत आहेत. सोमवारी दुपारनंतर थंडीचा कडाका आणखी वाढला. हा कडाका वाढण्याचे संकेत हवामान विभागाकडून मिळत असून दिवसभर उन्हे पडत असली तर हवेतील गारवा कायम आहे. दापोलीचे कमाल तापमान 23.8 तर किमान तापमान 8.3 अंश सेल्सिअस नोंवले गेले आहे. गेल्यावर्षी याचदिवशी कमाल तापमान 31 तर किमान तापमान 13.3 अंशी सेल्सिअस होते. उत्तरेकडून गार वारे दक्षिणेकडील बाजूस येत असल्याने ‘मिनी महाबळेश्वर’ थंडावले आहे. ही थंडी अजून काही दिवस कायम राहण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत.