प्रतिनिधी/ पणजी
सीमा शुक्ल विभागाचे सहाय्यक आयुक्त व्हाय. बी. सहारे यांच्या नेतृत्वाखाली गोवा कस्टमच्या एअर इंटलिजेंस युनिटने दाबोळी आंतरराष्ट्रीय प्रवाशाच्या बॅगेमधून 1.175 किलो ग्रॅम सोने जप्त केले आहे. बाजारभावानुसार त्याची किंमत 50 लाख रुपये इतकी आहे.
हा प्रवासी भारतीय पासपोर्टधारक कर्नाटकामधील भटकळचा रहिवासी आहे. गोवा कस्टमच्या अधिकाऱयांनी प्रवाशांच्या चेक-इन-बॅगेजमध्ये लपवून ठेवलेल्या दहा तोळे बार आणि एक सोनसाखळी जप्त केली आहे.
सीमाशुक्ल कायदा 1963 तरतुदीनुसार हे सोने जप्त करून प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात सोन्याच्या तस्करी प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गेल्या पंधरवडय़ात गोवा कस्टमने नोंदविलेले हे तिसरे सोने तस्करी प्रकरण आहे. 2021 या वर्षांत आतापर्यंत गोवा सीमाशुक्ल विभागाने 2.31 कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे.