ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असून, तब्बल 201 दिवसानंतर दैनंदिन रुग्णसंख्या 20 हजारांखाली आली आहे. सोमवारी देशात 18 हजार 795 नव्या संक्रमितांची नोंद झाली.179 रुग्ण दगावले. तर 26 हजार 030 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
देशात आतापर्यंत 3 कोटी 36 लाख 97 हजार 581 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 3 कोटी 29 लाख 58 हजार 002 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत देशात 2 लाख 92 हजार 206 उपचारार्थ रुग्ण आहेत. तर 4 लाख 47 हजार 373 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
देशात आतापर्यंत 87.07 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. मागील 24 तासात 1.02 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले.