ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाब काँग्रेसकचे देशाध्यक्ष सिद्धू कोणत्या ना कोणत्या कारणाने ते मुख्यमंत्र्यांना सुनावत असतात. आताही सिद्धू यांनी मुख्यमंत्री चन्नींना गंभीर इशारा दिला आहे. “मी कोणत्याही पदासाठी राजकारणात नाही. माझ्या शो दरम्यान मी महिन्याला सुमारे ५० लाख रुपये कमावत होतो. आज मी महिन्याला ५० हजार रुपयांपेक्षा कमी कमावतो. पण जेव्हा मला पंजाबच्या लोकांची काळजी घेण्याचे काम दिले आहे, तेव्हा मी तडजोड करू शकत नाही,” असं सिद्धू म्हणाले. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे की नाही, असं विचारलं असता ते म्हणाले, की “मला फक्त प्रचारासाठी वापरले जाणारे केवळ शोपीस बनायचे नाही, असेही ते म्हणाले आहेत.