प्रतिनिधी / सांगली
लोकसेवकांची भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास किंवा लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबतची तक्रार पोलीस उपअधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, सांगली टोल फ्री नंबर 1064, दूरध्वनी क्रमांक 0233-2373095 यावर किंवा पोलीस उपआयुक्त / पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे फोन क्रमांक 020-26122134 यावर संपर्क साधावा. तसेच मोबाईल ॲपचा (डाऊनलोड करण्यासाठी www.acbmaharashtra.net या लिंकचा वापर करावा, असे आवाहन ॲन्टी करप्शन ब्युरो सांगली चे पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे यांनी केले आहे.
कोविड योग्य वर्तणूक ठेवण्यासाठी योग्य पध्दतीने मास्क परिधान करावा, नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी आणि सुरक्षित अंतर (6 फूट) राखावे, साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात धुवावे, कोणालाही स्पर्श न करता नमस्कार अभिवादन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे यांनी केले आहे.