ऑनलाईन टीम / तरुण भारत
सरकारी कार्यालयांमध्ये यापुढे नेते आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो न लावता बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लावण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याचे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले. ते प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
यापुढे दिल्ली येथील सरकारी कार्यालयांमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लावण्याच्या निर्णय घेण्यात आला या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले कि, दिल्लीतील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये इथून पुढे नेते आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो लावले जाणार नाही. सगळ्या कार्यालयांमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचेच फोटो लावले जातील.
या कार्यक्रमामध्ये बोलताना अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली येथील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं, यावेळी केजरीवाल म्हणाले कि, गेल्या दोन वर्षांपासून देश कोरोना महामारीशी लढत आहे. देशात आत्ता तिसरी लाट सुरू असतील तरी दिल्लीत मात्र ही पाचवी लाट आहे. आणि कोरोनाचा सर्वाधिक फटका हा दिल्लीला बसला आहे. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावे जेणेकरून सर्वांच्याच आरोग्याची काळजी करत आरोग्य यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहू शकेल.