ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर एकाचा मृत्यू झाला आहे. तर कालच्या दिवशी 71 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, राजधानीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 35 हजार 281 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 09 हजार 572 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.10 % इतका आहे. तर आतापर्यंत 25,021 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सद्य स्थितीत 688 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 25 लाख 03 हजार 065 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 54,159 आरटीपीसीआर टेस्ट आणि 21,936 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत.
- लसीकरणाचा डाटा
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 1,29,054 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 92,547 जणांना पहिला डोस तर 36,507 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 90 लाख 73 हजार 103 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 69,41, 196 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 21,13,907 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.