ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात 2,780 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 लाख 09 हजार 339 वर पोहचली आहे. यामधील 21,701 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- एका दिवसात 3,057 रुग्ण कोरोनामुक्त
दिलासादायक बाब म्हणजे काल 3,057 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 2 लाख 81 हजार 869 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5,769 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 36 लाख 23 हजार 419 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 10,801 आरटीपीसीआर टेस्ट आणि 37,952 रैपिड एंटिजेन टेस्ट रविवारी करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 5.70 % आहे. तर 2710 झोन आणि 273 कंट्रोल रूम आहेत.