प्रतिनिधी / खेड
महाराष्ट्र शासनाच्या जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा व बांधकाम विभागाच्या कर्मचारी पतसंस्थाध्यक्षपदी रविउदय जाधव यांची सर्वानमते निवड करण्यात आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या शासकीय खात्याच्या कर्मचारी पतसंस्था अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. सर्व संचालकांनी बहुमताने अध्यक्षपदासाठी रविउदय जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. जीवन प्राधिकरण विभागातील बर्ग १ ते वर्ग ४ कर्मचारी, अधिकारी या पतसंस्थेचे सदस्य आहेत. पतसंस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण कोकण विभाग असून पतसंस्थेच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो.
पतसंस्थेच्या माध्यमातून दर्जेदार सेवा देवून पतसंस्था आणखी नावारूपास आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविउदय जाधव यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.