ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. देशाची राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 1647 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 16 हजार 993 वर पोहचली आहे. यामधील 17 हजार 807 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बुधवारी 2463 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 95 हजार 699 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3487 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 7,36,436 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 6564 आरटीपीसीआर टेस्ट आणि 15,964 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर दरम्यान, सध्या दिल्लीत 458 कॅन्टोन्मेंट झोन आहेत.