सांगली / प्रतिनिधी
सांगली शहर शिवसेनेचे पदाधिकारी अनिल शेटे यांच्या पत्नी गीता अनिल शेटे (वय 38 ) यांनी मीरा हौसिंग सोसायटी मधील पडक्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. गीता शेटे यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली याबाबत अद्याप ही अस्पष्टता आहे. गीता शेटे गुरुवारी सकाळी सहा वाजता आपल्या घरातून निघून गेल्या होत्या, त्यांच्या घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली होती. दरम्यान सकाळी साडे अकराच्या सुमारास मीरा हौसिंग सोसायटीतील पडक्या विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती शेजाऱ्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात कळवली. पोलीस आल्यानंतर त्यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी सदरचा मृतदेह वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.