ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. देशाची राजधानी दिल्लीत रविवारी 961 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 37 हजार 667 वर पोहचली आहे. यामधील 1 लाख 23 हजार 317 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- मृतांची एकूण संख्या 4004 वर
रविवारी 1186 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 23 हजार 317 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4004 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 10 लाख 63 हजार 669 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 4289 आरटीपीसीआर टेस्ट आणि 8441 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.