ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील कीर्ती नगरमधील फर्निचर मार्केटला आग लागली असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कीर्ती नगरमधील फर्निचर मार्केटमध्ये आज सकाळी ही आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमुळे कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीतील शास्त्री पार्कमध्ये आग लागली होती. यामध्ये 25 दुकाने जळून खाक झाली होती.