ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली कॅबिनेटने आमदारांचे वेतन आणि इतर भत्यांमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली. त्यानुसार, दिल्लीतील आमदारांना आता 90 हजार रुपये वेतन मिळणार आहे.
दिल्लीतील आमदारांचे वेतन सध्या 54 हजार रुपये प्रति महिना आहे. कॅबिनेटने मंजूर केलेल्या भत्यानुसार आमदारांना आता बेसिक सॅलरी 30 हजार रुपये, मतदारसंघ भत्ता 25 हजार, सचिवालय भत्ता 15 हजार, वाहन भत्ता 10 हजार आणि टेलिफोन भत्ता 10 हजार असे एकूण 90 हजार रुपये वेतन मिळणार आहे. वेतनवाढीमुळे आमदारांना दिलासा मिळणार असला तरी देखील दिल्लीतील आमदारांचे वेतन हे इतर राज्यातील आमदारांपेक्षा कमी आहे.