ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीमध्ये घातपाताचा मोठा कट उधळून लावण्यास पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांचे विशेष पथकाने शकरपुर परिसरात कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. तसेच हे सर्व दहशतवादी इस्लामिक आणि खलिस्तानी संघटनांशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष पथकाचे डी सी पी प्रमोद कुशवाह यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, दिल्लीतील शकरपूर परिसरात झालेल्या गोळीबारानंतर 5 दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामधील तीन जण काश्मीरमधील तर अन्य दोन जण पंजाबमधील आहेत. या सर्व दहशतवाद्यांना आयएसआयचा पाठिंबा होता असेही त्यांनी यावेळी सांगितले.