- अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनस्थळी दाखल
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी नवी दिल्लीतील लोधी रोडवर असलेल्या केंद्रीय तपास संस्था सीबीआय (CBI) च्या मुख्यालयाला गुरुवारी सकाळी आग लागली असल्याची घटना घडली आहे. अचानक आग लागल्याने सीबीआयचे सारे अधिकारी इमारती बाहेर पडले. इमारतीमध्ये धुराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ही आग नेमकी कशी लागली, कोणत्या फ्लोअरवर लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
सीबीआयच्या या मुख्यालयामध्ये महत्वाचे अनेक कागदपत्र असतात. यामुळे या आगीतून काय नुकसान झाले, त्याच्या मागचे कारण काय आदी गोष्टी देखील समोर येणे गरजेचे आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अग्निशमन दल आणि पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार या कार्यालयात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले जात आहे.