चित्रपटाबद्दल अभिनेत्री अत्यंत उत्सुक
अभिनेत्री उर्वशी रौतेला स्वतःची छायाचित्रे-चित्रफितींवरून अत्यंत चर्चेत असते. सोशल मीडियावर स्वतःची छायाचित्रे ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने आता इन्स्टाग्रामवर स्वतःच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याच्या शीर्षकाची घोषणा केली आहे.
दिल है ग्रे असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट थिरूट्टू पायल 2 चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट माझ्या मनाच्या अत्यंत जवळ असून अभिनेता विनीतसोबत काम करण्याचा अनुभव खरोखरच आनंददायी होता असे उर्वशीने म्हटले आहे.
उर्वशी लवकरच एका बिग बजेट तमिळ चित्रपटात दिसून येणार आहे. तिचा हा चित्रपट सायन्स-फिक्शन प्रकारातील आहे. यात ती एका मायक्रोबायोलॉजिस्ट अणि आयआयटीयनची भूमिका साकारत आहे. याचबरोबर ती ‘ब्लॅक रोज’ या चित्रपटातून झळकणार आहे. जियो स्टुडिओची वेब सीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’मध्ये ती रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिका साकारत आहे. तिची ही वेबसीरिज सुपर कॉप अविनाश मिश्रा आणि पूनम मिश्रा यांच्या सत्यकथेवर आधारित आहे.